ऑस्ट्रेलियन टेनिस : सेरेनाचे विक्रमी विजेतेपदांचे स्वप्नभंग

मेलबर्न – अमेरिकेची आग्रमानांकित टेनिसिपटू सेरेना विल्यम्स हिचे विक्रमी ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदांचे स्वप्न अखेर भंग झाले. ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरीत उपांत्य लढतीत सेरेनाला नाओमी ओसाकाकडून 6-3, 6-4 असा पराभव पत्करावा लागला.

कारकिर्दितील 24 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचे सेरेनाचे स्वप्न या पराभवामुळे धूळीला मिळाले. ओसाकाने या विजयासह चौथ्यांदा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या अंतिमन फेरीत प्रवेश केला. तीने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील सलग 20 सामन्यांच्या विजयांची मालिकाही कायम राखली.

अन्य लढतींत जागितक क्रमवारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या ऍश्‍ले बार्टीचे मायदेशात ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकणारी पहिली खेळाडू ठरण्यासाठी बार्टीने खूप कडवी लढत दिली.

मात्र, अखेर तिला कॅरोलिना मुचोवा हिच्याकडून 6-1, 3-6, 2-6 असा पराभव पत्करावा लागला. मुचोवाची लढत आता अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीशी पडणार आहे. वेगवान सर्व्हिस करणाऱ्या जेनिफर ब्रॅडी हिने जेसिका पेगुला हिचा कडवा प्रतिकार 4-6, 6-2, 6-1 असा मोडून काढला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.