मेक्सिको सीटी – जर्मनीचा जागतिक क्रमवारीतील सातवा मानांकित टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने मेक्सिकन ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
त्याने अंतिम सामन्यात ग्रीसचा अव्वल मानांकित स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6 (7-3) असे पराभूत केले. हा सामना तब्बल 2 तास 17 मिनिटे चालला. ज्वेरेवचा कारकीर्दीतील हे 14 वे एटीपी विजेतेपद ठरले. गेल्या वर्षी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा सामना करावा लागला होता.