पुणे – शशी वैद्य मेमोरियल आंतरक्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पीसीएलटीए, एफसी ब आणि एमडब्लूटीए एसपी कॉलेज या संघांनी दुसरा विजय मिळवला.
प्लेट डिव्हीजन गटाच्या सामन्यात पीसीएलटीए संघाने नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी संघाचा 24-08 असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. दुसऱ्या सामन्यात एफसी ब संघाने महाराष्ट्र मंडळ टी-20 संघाचा 23-13 असा पराभव करून विजयी मालिका कायम ठेवली.
विजयी संघाकडून पांडुरंग पडाळे, सुनील लोणकर, मिलिंद मारणे, आदित्य अभ्यंकर, सुमित सातोस्कर, शैलेश पटवर्धन यांनी सुरेख कामगिरी बजावली. एमडब्लूटीए एसपी कॉलेज संघाने नवसह्याद्री वॉरियर्स संघावर 24-05 असा विजय मिळवला.