#ATPChallenger : प्रजनेश गुणेश्वरन अंतिम सामन्यात पराभूत

कॅरी(अमेरिका) – भारताचा टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनला कॅरी एटीपी चॅलेंजर (अटलांटिक टायर चॅम्पियनशिप) टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या डेनिस कुडला याने त्याचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रजनेशचा अमेरिकेच्या डेनिसने 6-3, 3-6, 0-6 असा पराभव केला. ही लढत 1 तास 33 मिनिटे चालली. प्रजनेशने अंतिम सामन्यात शानदार सुरूवात करत पहिला सेट जिंकला. पण पुढील दोन सेटमध्ये प्रजनेशला कामगिरीत सातत्य न राखता आल्याने डेनिस पुढील दोन सेट जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले.

दरम्यान, याआधी प्रजनेशने उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या थाॅमस बेलूची याचा 3-6, 7-5, 7-6 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यानंतर उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मायकल त्रोपेगार्ड विरूध्द प्रजनेशला पुढे चाल मिळाल्याने (वॉकओवर) अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.