पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) आयोजित नवव्या शशी वैद्य मेमोरियल आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत साखळी फेरीत पीसीएलटीए संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत सलग तिसरा विजय मिळवला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्लेट डीव्हिजन गटात झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात डॉ.राजेश मित्तल, प्रवीण घोडे, विजय खन्ना, कल्पेश मकणी, अनंत गुप्ता, निर्मल वाधवानी, गिरीश कुलकर्णी, रवी जौकनी यांच्या सरस कामगिरीच्या जोरावर पीसीएलटीए संघाने लॉ चार्जर्सचा 24-07 असा पराभव करून तिसऱ्या विजयाची नोंद केली.
अन्य लढतीत मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन संघाने एमडब्लूटीए एसेस संघाचा 21-16 असा तर, एफसी कमांडोज संघाने नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमीचा 21-17 असा पराभव करून विजयी सुरुवात केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – साखळी फेरी – मॉंट व्हर्ट प्रीस्टाईन वि. वि. एमडब्लूटीए एसेस 21-16 (100अधिक गट – नटराजन/गिरीश कुकरेजा पराभूत वि. राहुल सिंग/संजय आशेर (7) 5-6; 90 अधिक गट – सचिन माधव/संजीव माधव वि. वि. प्रणील बाडकर/पार्थ मोहपात्रा 6-4;
खुला गट – विनीत शहा/मनीष टिपणीस पराभूत वि. विक्रम गलानी/रजत फेरवाल 4-6;
खुला गट – मनू नांजीगौडा/गिरीश कुकरेजा वि. वि. प्रफुल आशेर/प्रफुल नागवाणी 6-0); पीसीएलटीए वि. वि. लॉ चार्जर्स 24-07 (100अधिक गट – डॉ. राजेश मित्तल/प्रवीण घोडे वि. वि. नितीन खैरे/नितीन गवळी 6-1; 90
अधिक गट – विजय खन्ना/कल्पेश मकणी वि. वि. मिलिंद राऊत/संदीप माहेश्वर 6-0; खुला गट – अनंत गुप्ता/निर्मल वाधवानी वि. वि. श्रीनिवास रामदुर्ग/राहुल मंत्री 6-4;
खुला गट – गिरीश कुलकर्णी/रवी जौकनी वि. वि. प्रतीक कुसाळकर/नितीन गवळी 6-2); एफसी कमांडोज वि. वि. नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी 21-17 (100
अधिक गट – योगेश वडघुले/अभय एस. पराभूत वि. उदय टेकाळे/डॉ. बाळासाहेब पवार 4-6; 90
अधिक गट – संजय पाटील/श्री वर्धन वि. वि. सचिन फणसाळकर/मंदार कापशीकर 6-3; खुला गट – मनमीत लांबा/श्रीकांत आर. पराभूत वि. आदित्य टेकाळे/अविनाश पवार (8) 5-6;
खुला गट – लक्ष्मण विडेकर/नकुल फिरोदिया वि. वि. नकुल देशपांडे/रितेश
चौधरी 6-2).