टेनिस : अजमीर शेखचा उपांत्य फेरीत प्रवेश

पाचगणी -बिगर मानांकित अजमीर शेखने अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत सातव्या मानांकित ओमर सुमर याचा तर अव्वल मानांकित मानस धामणेने विनीत मूत्याला याचा रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 14 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अजमीर शेखने ओमर सुमर यांचा 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये सहज पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित मानस धामणेने तेलंगणाच्या विनीत मूत्याला याचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तेलंगणाच्या देवहरशीत नीलम याने जैष्णव शिंदेचा 1-6, 6-1, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव केला तर वीर प्रसादने अंशुल सातवचा 7-5, 7-6(3) असा टायब्रेक मध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात सोनल पाटीलने गुजरातच्या माही शहाचा 6-0, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित तमिळनाडूच्या लक्ष्मी अरुणकुमार हिने महाराष्ट्राच्या बिगरमानांकित दिया चौधरीचा 6-2, 6-3 असा तर तेलंगणाच्या सौम्या रोंडेने जुई काळेचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला. संघर्षपुर्ण लढतीत गुजरातच्या दुस-या मानांकित पवित्रा पारीखने सहाव्या मानांकित श्रावणी खवळेचा 6-1, 4-6, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)