मुंबई – प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना(एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत इशाक इकबालने तिर्थ मचेर्लाचा व सहाव्या मानांकीत पृथ्वी शेखरने राघव जयसिंघानीचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत बिगर मानांकित ईशाक इकबालने आपल्या दमदार विजयी कामगिरीत सातत्य राखत तीर्थ मचेर्ला याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर, दुसऱ्या सामन्यात सहाव्या मानांकीत पृथ्वी शेखरने राघव जयसिंघानी याचा 6-3, 6-0 असा पराभव केला.