टेनिस : गोकुळ सुरेश, तिर्थ मचेर्ला यांचा मानांकीत खेळाडूंना धक्‍का

आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

मुंबई – बिगर मानांकीत गोकुळ सुरेशने तिसऱ्या मानांकीत धर्मिल शहा, तर तिर्थ मचेर्लाने नवव्या मानांकीत अन्वित बेंद्रेचा पराभव करत 3000 डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत खळबळजनक निकालाची नोंद केली.

प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना (एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बिगर मानांकीत गोकुळ सुरेशने तिसऱ्या मानांकीत धर्मिल शहाचा 6-4, 6-3 असा पराभव करत विजय संपादन केला. तर बिगर मानांकीत तिर्थ मचेर्लाने नवव्या मानांकीत अन्वित बेंद्रे याचा 2-6, 6-4, 7-6(7) असा संघर्षपुर्ण लढतीत टायब्रेकमध्ये पराभव करत विजयी आगेकूच केली.

अव्वल मानांकीत जतिन दहियाने आकाश नानदवाल याचा 6-0, 6-0 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. संघर्षपुर्ण लढतीत सहाव्या मानांकीत पृथ्वी सेखर याने जयचंद्रन विमलराज याचा 6-1, 5-7, 6-1 असा तीन सेटमध्ये पराभव केला. चौथ्या मानांकीत चंद्रील सुदने यिगल बन्सलचा 6-3, 6-4, तर पाचव्या मानांकीत तेजस चौकुलकरने दिवेश गहलोत याचा 6-0, 6-1 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

सविस्तर निकाल :-

पहिली फेरी – गोकुळ सुरेश (भारत) वि.वि धर्मिल शहा (भारत) (3) 6-4, 6-3, तिर्थ मचेर्ला (भारत) वि.वि अन्वित बेंद्रे (भारत) (9) 2-6, 6-4, 7-6(7), जतिन दहिया (भारत) (1) वि.वि आकाश नानदवाल (भारत) 6-0, 6-0, ईशाक ईकबाल (भारत) वि.वि द्रोण वालीया (भारत) 6-2, 6-2, भुपती साकथीवेल (भारत) वि.वि सौमील साकारीया (भारत) 6-0, 6-1, साहिल गवारे (भारत) वि.वि ताहा कपाडीया (भारत) 6-4, 6-3, परमवीर बाजवा (भारत) (7) वि.वि आदित्य बलसेकर (भारत) 6-4, 6-2, चंद्रील सुद (भारत) (4) वि.वि यिगल बन्सल (भारत) 6-3, 6-4, तेजस चौकुलकर (भारत) (5) वि.वि दिवेश गहलोत (भारत) 6-0, 6-1, पृथ्वी सेखर (भारत) (6) वि.वि जयचंद्रन विमलराज (भारत) 6-1, 5-7, 6-1, अथर्व शर्मा (भारत) वि.वि गॉरी टोकस (भारत) 6-4, 7-5, रोहन गजारी (भारत) वि.वि अर्णव गोयल (भारत) 6-3, 6-4, पटलोला रेड्डी (भारत) (8) वि.वि करण लालचंदानी (भारत) 7-5, 6-1, राघव जयसिंघानी(भारत) वि.वि आकाश अहलावत (भारत) 6-4, 6-2.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.