टेनिस : परमवीर, गॅरी, द्रोणा, आदित्य यांचा मुख्य फेरीत प्रवेश

आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा

मुंबई  – प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना (एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेत पुरुष गटात परमवीर बाजवा, गॅरी टोकस, द्रोणा वालिया, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य प्रवेश केला.

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बॅंक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित परमवीर बाजवा याने राघव जयसिंघानीचा 6-2, 7-5 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. गॅरी टोकस याने आकाश अहलावतचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. आदित्य बलसेकरने रोहीन गजरीला 7-5, 6-4 असे पराभूत करून आगेकूच केली.

सविस्तर निकाल – अंतिम पात्रता फेरी –

पुरुष गट – परमवीर बाजवा(भारत)(1)वि.वि.राघव जयसिंघानी(भारत)6-2, 7-5, द्रोणा वालिया(भारत)वि.वि.पारस दहिया(भारत)(2)5-3सामना सोडून दिला, गॅरी टोकस(भारत)वि.वि.आकाश अहलावत(भारत)6-3, 6-4, आदित्य बलसेकर(भारत)वि.वि.रोहीन गजरी(भारत)7-5, 6-4.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.