ATP finals 2020 : थीम आणि मेदवेदेव लढणार विजेतेपदासाठी

एटीपी फायनल्स स्पर्धेला नवा विजेता मिळणार

नवी दिल्ली – एटीपी फायनल्स स्पर्धेमध्ये शनिवारी दोन मोठे उलटफेर पहायला मिळाले. दोन दिग्गज खेळाडूंना उपांत्य फेरीत पराभव पहावा लागला. त्यामुळे सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि स्पेनचा राफेल नडाल यांना अंतिम सामन्यात जागा मिळविता आली नाही. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत एकीकडे  ऑस्ट्रियाचा डोमिनिक थीमने जोकोविचचा तर दुसरीकडे रशियाच्या दानिल मेदवेदेवने नडालचा पराभव केला.

पहिल्या उपांत्य फेरीत डोमिनिक थीमने जोकोविचचा 7-5, 6-7(10), 7-6(5) असा तर दुसरीकडे मेदवेदेवने नडालचा 3-6,7-6 (7/4), 6-3 असा पराभव केला. नडाल विरुद्धचा मेदवेदेवचा हा पहिला विजय ठरला.

एटीपी क्रमवारीत थीम तिसऱ्या तर मेदवेदेव चौथ्या स्थानावर आहे. आता फायनलमध्ये मेदवेदेवची लढत डॉमिनिक थीमविरुद्ध होणार आहे. याआधी या दोघांमध्ये 4 सामने झाले आहेत. त्यातील 3 सामन्यात थिमने बाजी मारली आहे, तर मेदवेदेवने 1 सामना जिंकला आहे.  एटीपी फायनल्सचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार  रविवारी(22 नोव्हेंबर)  रात्री 11.30 वाजता होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.