मुंबई: क्रिकेट क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर या दोन महान खेळाडूंनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या बांद्रा येथील मातोश्री या निवासस्थानी ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती असे संबंधीत सूत्रांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत आहेत. विविध क्षेत्रातील समस्या समजावून घेण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांना स्वत: मुख्यमंत्रीही काही वेळा भेटीला बोलावतात. त्याच पार्श्वभूमीवर स्वत: मुख्यमंत्र्यांनीच या दोन नहान क्रिकेटपटूंना बोलावले होती की कसे हे मात्र समजू शकले नाही. पण या दोन्ही क्रिकेटपटुंचे ठाकरे घराण्याशी नेहमीच कौटुंबिक संबंध राहिले आहेत.