वॉशिंग्टन – काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनामुळे 150 बळी गेल्याची घटना ताजी असतानाच आज देखील येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. आज अमेरिकेत एकाच दिवशी दहा हजार कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळून आल्याने कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 54 हजारांवर गेली आहे.
आतापर्यंत कोरोनाने सातशेच्या वर अमेरिकी नागरिकांचा बळी घेतला असला तरी येत्या 12 एप्रिलपर्यंत अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा खुली होईल, असा विश्वास अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
न्यूयॉर्क शहर आणि आसपासचा भाग सर्वाधिक बाधित भाग म्हणून ओळखला जात असून त्याखेरीज न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, मिशीगन, फ्लोरिडा हेही हॉटस्पॉट बनले आहेत. तथापी राजधानी वॉशिंग्टन मधील स्थिती आता नियंत्रणात आहे.