कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनचे दहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत नगरसेवक राजेंद्र यादव, मुख्याध्यापक अर्जुन कोळी व इतर

कराड – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी घेतलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत कराड नगरपालिका शाळा क्र. 3 ने यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचे 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. तर कृष्णाली प्रकाश पवार ही राज्यात गुणवत्ता यादीत आली आहे. तर प्रणव इंगवले याची सातारा सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव व मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजेंद्रसिंह यादव म्हणाले, शाळा क्र. 3 ही राज्यात नव्हे तर देशात शासकीय शाळेत सर्वात जास्त म्हणजे 2379 पटसंख्येची शाळा असून केवळ पटाकडे लक्ष न देता गुणवत्तेतही ही शाळा आघाडीवर आहे. या शाळेने शिष्यवृत्ती, नवोदय व सैनिक स्कूलमध्ये निवड होण्याची परंपरा जपली आहे. पाचवी शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत कृष्णाली पवार ही राज्यात 15 वी आली असून संकेत फल्ले हा जिल्ह्यात 30 वा आला आहे.

विघ्नेश कुर्ले (85 वा), प्रणव इंगवले (97 वा), फरहान शेख (105) तन्वी साळुंखे (112 वी), श्रावणी फडतरे (113 वी), सानिया पाटील (172 वी), फातिमा मोदी (184 वी), प्रणव थोरात (191 वा) यांनी यश संपादन केले. वर्गशिक्षिका सौ. सुशिला अनिल जाधव यांच्या प्रयत्नामुळे हे यश मिळाले आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारची सुविधा शाळेस पुरविण्यास येईल.

अर्जुन कोळी म्हणाले, शिक्षकांनी गुणवत्तेसाठी केलेले सामुदायिक प्रयत्न यामुळे दरवर्षी यशात भर पडत आहे. प्रवेशासाठी पालकांची प्रचंड मागणी आहे. मात्र जागेअभावी प्रवेश देणे शक्‍य होत नाही. यावेळी पर्यवेक्षक संग्राम गाढवे, अजितराव भोसले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.