सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दहा जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता ६३१ झाली आहे.
जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट करोनाबाधित आले आहेत. यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील ६० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यूपश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
या दहा बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुष (मृत) व सोमेश्वरवाडी येथील ६८ वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील आसवली येथील ६० वर्षीय पुरुषाचा साताऱ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या पुरुषाला सारीचा आजार होता. खटाव तालुक्यातील पाचवड येथील ३० वर्षीय पुरुष व विसापूर येथील ७१ व ६२ वर्षीय पुरुष
जावळी तालुक्यातील काळोशी येथील ३९ वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील २८ वर्षीय व २६ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
१८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
पुण्यातील एन.सी.सी.एस. यांच्याकडून रात्री उशिरा प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार १८१ जण निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.