भोर तालुक्‍यात दहा जण पॉझिटिव्ह

भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्‍यात आज चार जणांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात भोर शहर 1, हायवे पट्ट्यातील उंबरे येथे 1, खोपी येथे 1 व तांभाड येथे 1, भोंगवली 4, भोलावडे 1, कुसगाव 1 असे एकूण दहा जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्‍यातील करोना बाधितांच्या आकड्यात घट होत असल्याने नागरिकांनी प्रशासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास करोना तालुक्‍यातून हद्धपार होऊ शकेल, असा विश्‍वास वैद्यकीय अधिकारी व्यक्त करीत आहेत.

भोर तालुक्‍यात आज अखेर 221 करोना बाधित रुग्ण आढळले असून यातील 149 जणांनी करोनावर मात केलेली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडले असून, 65 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सात जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ, सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले. भोर शहरात लॉकडाऊन शिथील केले तरी सकाळी खरेदीसाठी गर्दी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.