पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – घोले रस्ता येथील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील आणखी दहा विद्यार्थ्यांना डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
याबाबत महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी माहिती दिली. मागील आठवड्यात या वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाला भेट दिली.
यावर “वसतिगृहामधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आणखी दहा विद्यार्थी डेंग्यूबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना उपचारांसाठी कमला नेहरू रुग्णालय आणि बाणेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसतिगृहामध्ये स्वच्छता रहावी, यासाठी सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना मच्छरदाणी पुरवणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, ढेकणांचा त्रास होऊ नये, यासाठी ते फायरगनने नष्ट करणे अशा उपाययोजना सांगितल्या आहेत. येथे नियमित आरोग्य तपासणीही केली जाणार आहे,’ असे आयुक्तांनी सांगितले.