इचलकरंजीतून दहा लाखाच्या बनावट नोटा जप्त

कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीतील दातार मळा येथील एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

मुख्य संशयित जीवन धोंडिबा वरुटे (वय 24 रा. दातार मळा, लिंबू चौक, इचलकरंजी), सागर शिवानंद कडलगे (21 रा. संभाजी चौक, लंगाटे मळा, इचलकरंजी) रोहित राजू कांबळे (19 रा. दुसरी गल्ली, दातार मळा, इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडून दहा लाख एक हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

तीन महिन्यापासून नोटा तयार करुन दैनंदिन व्यवहारात खपविल्या जात होत्या, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत हे उपस्थित होते.

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैशाचे वाटप होण्याची शक्‍यता गृहित धरुन बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस हवालदार श्रीकांत मोहिते यांना इचलकरंजी येथील दातार मळा येथे संशयित जीवन वरुटे हा बनावट नोटांची छपाई करुन व्यवहारात वापरत असल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने दातार मळा परिसरात सापळा रचून कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.