पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज करोनाबाधित आणखी दहा रुग्णांचा मृत्यू झाला. तर 313 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे आतपर्यंत करोनाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 84 हजार 564 झाली आहे.
बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 289 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 24 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 8 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 84,564 रुग्णांची नोंद झाली आहे.
सद्यस्थितीत शहरात 2797 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 421 रुग्णांचाही समावेश आहे. बुधवारी 468 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 79,746 इतकी झाली आहे. 592 संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत.