शिरवळ – धनगरवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला. या अपघातात चालक जागीच ठार झाला आहे. जालिंदर खंडू तालवर (वय 45, रा. धनगरवाडी ता. खंडाळा) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, धनगरवाडी येथील जालिंदर तालवर हे आपल्या टेम्पोमधून एका कंपनीकडे निघाले होते. टेम्पो एका कंपनीलगत असणाऱ्या एका रस्त्यावर आला असता त्यांचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो रस्त्याकडेलाच पलटी झाला. या अपघातात चालक तालवर हे गंभीर जखमी झाले.
टेम्पो पलटी झाल्याचे निदर्शनास येताच जवळील कंपनीच्या सुरक्षारक्षकाने ही माहिती धनगरवाडी येथील नवनाथ जानकर यांनी दिली. त्यानंतर नवनाथ जानकर हे मारुती खंडू जानकर यांना घेऊन तात्कळ घटनास्थळी धाव घेत जखमी तालवर यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तालवर यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून संतोष मठपती अधिक तपास करत आहेत.