कोरेगाव भीमा – येथील भीमा नदीवरील पुलावर भरधाव ट्रकने अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून दुचाकी आणि टेम्पोच्या झालेल्या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ गडेप्पा हचगोट्टी, अंकुश हावगीराव भाले असे जखीम झालेल्यांची नावे आहेत. सोमनाथ गडेप्पा हचगोट्टी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. तर बाबूराव विलास कदम यांनी फिर्याद दिली आहे.