कोल्हापूर : आज उद्धव ठाकरे यांनी आई अंबाबाईचे दर्शन घेऊन, बाळूमामा यांचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठी घोषणा केली तसेच विरोधकांवर जोरदार हल्लबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आमचे सरकार आले तर आम्ही राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे केवळ पुतळे उभा करणार नाही तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिरं उभारणार. तसेच महाराष्ट्रातच नाहीतर सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
विरोधकांवर केली टीका
इंग्रजांना विरोध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. त्याच सुरतेमध्ये महाराष्ट्राच्या पाठीत वार करुन तुम्ही गद्दार घेऊन गेला होता. त्याच सुरतमध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 50 खोके घेऊन तुम्ही महाराष्ट्र विकत घेऊ शकत नाही. तुमचे कितीही जन्म गेले तरी माझा महाराष्ट्र तुमच्या खोक्यात मावू शकणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच मी उमेदवारी दिली, मान सन्मान दिला, प्रेम दिले.सगळं देऊन शिवसेना सारख्या आईवर वार कसा काय करु शकतो असे म्हणत शिवसेना सोडलेल्यांवर ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला.