पुणे शहरातील तापमानात घट, थंडीत किंचित वाढ

गुरुवारी 31.9 अंश सेल्सिअस कमाल आणि 13.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

 

पुणे – शहर परिसरात ऐन जानेवारीमध्ये थंडीने पाठ फिरविल्याने अलीकडील काळात उकाडा वाढला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान तापमानात सातत्याने घट होत असून, थंडीत किंचित वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात थंडीला अडसर निर्माण झाला होता. ऐन जानेवारीत पावसाळी स्थिती निर्माण होऊन, कमाल तापमानातही लक्षणीय वाढ झाली होती.

मात्र, 18 जानेवारीपासून शहरातील किमान तापमानात सातत्याने घट नोंदविण्यात येत असून, त्यामुळे हवेतील गारवा वाढत असल्याचे जाणवत आहे. पुढील काही दिवस हवामान कोरडे राहून, थंडीत किंचित वाढ होईल, असा अंदाज विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान, गुरुवारी पुण्यात 31.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 13.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर, लोहगाव येथे 32.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान आणि 16.1 किमान तापमानाची नोंद झाली.

गेल्या काही दिवसांतील किमान तापमानातील घट (अंश सेल्सिअसमध्ये)
18 जानेवारी – 18.1
19 जानेवारी – 16.6
20 जानेवारी – 16.1
21 जानेवारी – 13.9

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.