#Prokabaddi2019 : तेलुगु टायटन्सपुढे खडतर आव्हान

मुंबई – आतापर्यंत चारही सामन्यांमध्ये पराभूत झालेला तेलुगु टायटन्सचा संघ ही अपयशाची मालिका आज यू पी योद्धाविरुद्धच्या सामन्यात खंडित करणार की नाही याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अन्य लढतीत यु मुंबा संघासमोर बलाढ्य गुजरात फॉर्च्युनाजाएंट्‌सचे आव्हान असेल.

एनएससीआयच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत टायटन्सच्या खेळाडूंनी सपशेल निराशा केली आहे. सर्वच आघाड्यांवर त्यांना सूर सापडलेला नाही. योद्धा संघाने येथे यू मुंबा संघावर सनसनाटी विजय नोंदविला असून या विजयामुळे त्यांचे पारडे जड झाले आहे.

सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली आहे. आजही ते दोन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कौशल्य दाखवतील अशी अपेक्षा आहे. घरच्या मैदानावर मुंबा संघास अद्याप अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ करता आलेला नाही. खोलवर चढाया करण्यात माहीर असलेल्या मुंबाकडून तसा खेळ दिसलेला नाही.

यू मुंबा विरूध्द गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स
स्थळ- मुंबई
वेळ – रात्री 7.30 वाजता.

गुजरात फॉर्च्युनजाएंट्‌स

बलस्थाने- सांघिक कौशल्यपूर्ण खेळाबाबत ख्याती खोलवर चढायांवर चांगली हुकमत कच्चे दुवे- पकडींमध्ये नकळत चुका शेवटच्या 3-4 मिनिटांमध्ये घिसडघाई

यू मुंबा

बलस्थाने- भक्कम पकडी करण्यात माहीर, अनुभवी खेळाडूंची मांदियाळी
कच्चे दुवे- घरच्या मैदानावर खेळताना मानसिक दडपण, सांघिक कौशल्याचा अभाव, चढायांमध्ये अनेक चुका.

यू पी योध्दा विरूध्द तेलुगु टायटन्स्
स्थळ- मुंबई
वेळ – रात्री 8.30 वाजता.

तेलुगु टायटन्स

बलस्थाने- युवा खेळाडूंची मांदियाळी तंदुरूस्तीबाबत वरचढ कच्चे दुवे- लागोपाठ्‌च्या पराभवामुळे दडपण सांघिक कौशल्याचा अभाव

यू पी योद्धा

बलस्थाने- मुंबावरील विजयामुळे मनोधैर्य उंचावले
शेवटपर्यंत झुंज देण्याची क्षमता कच्चे दुवे- पकडीत अक्षम्य चुका चढायांवर नियंत्रण नाही

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.