तेलुगू अभिनेत्री नागा झांसीची आत्महत्या

हैद्राबाद : हैद्राबाद येथे तेलुगू अभिनेत्री नागा झांसी हिने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागा झांसी टीव्हीवरील “पवित्र बंधन’ या मालिकेमुळे प्रसिद्धीस आली होती. तिने काही चित्रपटांतही काम केले आहे. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.
नागा झांसी वारंवार बेल वाजवूनही दरवाजा उघडत असल्याने भाऊ दुर्गा प्रसाद याने पोलिसांना कळवले.

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिल्यानंतर नागा झांसीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलीस निरिक्षक बी. मोहन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री घरात एकटी राहत होती. मृत्यूआधी ती एका व्यक्तीशी चॅट करत होती. गेल्या सहा महिन्यांपासून ती या व्यक्तीच्या संपर्कात होती. पोलिसांनी मोबाइल जप्त केला असून कॉल डाटा आणि चॅट रेकॉर्ड तपासत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातेवाईकांनी नागा झांसीचे त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा दावा केला आहे. पण कुटुंबीयांना नात्यास नकार दिल्याने गेल्या काही दिवसांपासून ती तणावात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)