तेलतुंबडे यांच्या कोठडीला 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई – दलित विचारवंत आणि एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना सुनावलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेची कोठडीला आज विशेष न्यायालयाने 25 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली. तेलतुंबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना “एनआयए’ने 14 एप्रिल रोजी अटक केली होती. त्यानंतर त्यांना “एनआयए’ची कोठडी सुनावण्यात अली होती.

तेलतुंबडे यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील तपशील त्यांच्यासह तपासायचा असल्यामुळे कोठडीला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी “एनआयए’ने विशेष न्यायालयाकडे केली होती. तेलतुंबडे यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्यात आली आहे. त्या कागदपत्रांची छाननी करणेही आवश्‍यक आहे, असेही “एनआयए’ने म्हटले होते. तेलतुंबडे यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून निधी मिळालेला आहे. तसेच ते आणि “सीपीआय-एम’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या काही अज्ञात व्यक्‍तींमध्ये मोठे कारस्थान झाले असल्याचा आरोपही “एनआयए’ने केला आहे.

या प्रकरणी अन्य एक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि अन्य 9 जणदेखील या प्रकरणी सहआरोपी असून त्यांच्याविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.