वाईत दुर्गा दौडीची सांगता

उदयनराजे, मदन भोसलेंनीही साधला धारकऱ्यांशी संवाद 

वाई  – घटनस्थापनेपासून वाई शहरात सुरू झालेल्या दुर्गा दौडची मंगळवारी दसऱ्यादिवशी सांगता झाली. यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते दौडचा शुभारंभ झाला. दरम्यान, यावेळी उदयनराजे भोसले यांच्या माजी आमदार मदन भोसले यांनीही धारकऱ्यांशी संवाद साधला.

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने राज्यभरात नवरात्र उत्सव काळात नऊ दिवस दुर्गा दौडचे आयोजन करण्यात येते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा मंत्राने दुर्गा दौडची सुरुवात करण्यात येते. यावर्षी वाई तालुक्‍यात तर या दौडची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली असून नवरात्र उत्सवातील दौडला तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला. वाई तालुक्‍यात प्रत्येक गावातून स्वप्रेरणेने धारकरी या दुर्गादौडमध्ये सामील झाले होते. दसऱ्याच्या दिवशी या दुर्गादौडची सांगता करण्यात येते.

मंगळवार दि. 8 रोजी सकाळी नऊ वाजता महागणपती घाटावरून आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते महागणपतीची आरती व ध्वजाचे पूजन करून, प्रेरणा मंत्राने अतिशय उत्साही वातावरणात दुर्गादौडचा शुभारंभ करण्यात आला. तर माजी खासदार उदयनराजे भोसले व माजी आमदार मदन भोसले यांनीही ध्वजाचे पूजन करून धारकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी हजारो धारकरी गणपती घाटावर भगव्या रंगाचे फेटे बांधून उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, श्रीमती विजयाताई भोसले, संदीप जायगुडे, संदीप साळुंखे, संतोष काळे, दीपक ओसवाल, भारत खामकर, भैया डोंगरे, अजित शिंदे, महेंद्र धनवे, काळू आबा गुरव, किशोर भोसले, दीपक हजारे, राजेंद्र तांबेकर, आप्पा मालुसरे, विजयसिंह नायकवडी, सतीशराव ओतारी, तानाजी चंद्रकांत भोसले, गणेश जाधव, विवेक भोसले, हिंदुराव सुळके, सचिन खरात, दिनेश खैरे, योगेश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.