पिंपरी, (प्रतिनिधी) – अग्र म्हणजे अति उत्तम, सर्वोत्तम असा अर्थ आहे. अग्र ही पदवी आहे.आपल्या आगरवाल पूर्वजांचा इतिहास महान आहे. आपला इतिहास आणि संस्कृती आपल्या नव्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजेत.
त्यामुळे समाजासोबत नव्या पिढीची नाळ जोडली जाईल.असे उद्गार अखिल भारतीय अग्रवाल कॉन्फरन्सचे अध्यक्ष अनुप गुप्ता यांनी काढले.
श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण यांच्या वतीने अग्रसेन महाराजांच्या जयंतीनिमित्त चिंचवड येथे 130 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी आहारतज्ज्ञ अतुल शहा, पंच समिती सदस्य वेदप्रकाश गुप्ता, रामअवतार आगरवाल, माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, राजकुमार गुप्ता, विनोद बन्सल, अशोक बन्सल, सुभाष बन्सल, श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आर. आगरवाल, सचिव सुनील जे. आगरवाल,
विनोद मित्तल, धर्मेंद्र आगरवाल, गौरव आगरवाल,आनंद आगरवाल, सागर आगरवाल, जोगिंदर मित्तल, सत्पाल मित्तल, संदीप गुप्ता, महिला अध्यक्ष मीनल जाजोदिया, अनिता जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील आगरवाल म्हणाले कि, पूर्वीच्या तुलनेते आज जयंती निमित्ताने सुमारे बाराशे ते दीड हजार समाज बांधव एकत्र येतात, ही आनंददायी बाब आहे, असे सांगत दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आरोग्य विमा काढण्याकरिता ट्रस्टला दोन लाख रुपये देणगी जाहीर केली.
श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड-प्राधिकरण कार्यकारिणी संस्थापक सदस्य, पंच कमिटी सदस्य श्री अग्रसेन युवक संघ,डॉक्टर सदस्य, अग्रवाल समाज महिला मंडळ यांनी कार्यक्रम आयोजनासाठी पुढाकार घेतला.
शोभयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
श्री अग्रसेन महाराज यांच्या प्रतिमेची शोाभायात्राबिग इंडिया चौकामधून सुरू झही शोभायात्रा पायी भेळ चौक मार्गे निघाली. श्री अग्रसेन गार्डन,-भक्ती शक्ती जवळ असलेल्या अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्या जवळ विसावा घेतला.
यावेळी माजी उपमहापौर शैलेजा मोरे, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, सामाजिक कार्यकत राजेंद्र बाबर, निलेश शिंदे, ट्रस्टचे माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल,
अध्यक्ष सुनील आगरवाल आदी मान्यवरांनी अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन केले. ही शोभा यात्रा पुणेब -मुंबई महामार्गाने चिंचवड येथील अग्रसेन भवनकडे मार्गस्थ झाली.