तेलंगणा वापरणार लसींसाठी ड्रोन

नवी दिल्ली : तेलंगणा सरकारने लसींच्या पुरवठ्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी त्यांना नागरी विमान वाहतूक खात्याने अनुमती दिली आहे. काही मर्यादित भागात प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली जाणार आहे.

तेलंगणा सरकारला आम्ही या सेवेसाठी प्रायोगिक तत्त्वावर अनुमती दिली आहे, अशी माहिती विमान वाहतूक मंत्रालयाच्या ट्‌विटर हॅंडलवर देण्यात आली आहे. ही अनुमती वर्षभरासाठी आहे.

देशात अन्यत्र ड्रोनचा वापर करून लसी पोचवण्याच्या विषयावर व्यवहार्यता तपासून अहवाल सादर करण्याची सूचना आयसीएमआरलाही करण्यात आली आहे. देशाच्या सर्व दुर्गम भागातही करोनाचे रुग्ण आढळून येत असून, त्या भागातील लसीकरणाचे मोठे आव्हान सरकारपुढेही आहे. त्यासाठी अशा अत्याधुनिक माध्यमांचा वापर करण्याचे तंत्र कितपत कामी येईल, याचा अभ्यास केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.