हैदराबाद, दि. 14 – तेलंगणाच्या अनेक भागाला आज तुफानी पावसाने चांगलेच झोडपले. त्यामुळे विविध ठिकाणी ज्या पडझडीच्या घटना घडल्या त्यात अकरा जण ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले.
बंडलागुडा येथे मोहम्मेदिया हिल्स भागात एक सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जण ठार झाले. दुसऱ्या एका घटनेत इब्राहिमपट्ट्णम भागात एका घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक 40 वर्ष वयाची महिला आणि तिचा पंधरा वर्ष वयाचा मुलगा असे दोन जण ठार झाले. गेले दोन दिवस तेथे हा पाऊस पडत असून अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. हैदराबाद शहरातील जनजीवनही काल आणि आज झालेल्या तुफानी पावसामुळे विस्कळीत झाले आहे.