हैद्राबाद (तेलंगणा) – कॉंग्रेस पक्षातील 12 आमदारांनी नुकताच टीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजाविली आहे. याबाबत त्यांना चार आठवड्यांमध्ये खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच न्यायालयाने मंगळवारी तेलंगणा विधानसभेच्या सभापतींसह अध्यक्ष, सचिव आणि निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली होती.
दरम्यान, कॉंग्रेसच्या 18 आमदारांपैकी 12 आमदारांनी 6 जून रोजी तेलंगणा विधानसभा अध्यक्षांची भेट घेवून टीआरएस पक्षात प्रवेश करण्याची विनंती करत पक्षांतर केले होते. या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी याचिका दाखल करण्यात आली होती.