हैदराबाद- राज्याच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असल्यामुळे तेलंगणमधील सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे पूर्ण वेतन दिले जाणार असल्याची माहिती त्या राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज दिली. स्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. त्यामुळे जून महिन्यात कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे ट्वीट राव यांनी केले आहे.
तेलंगणने करोनाचे संकट गडद झाल्यानंतर लॉकडाउनच्या काळात 30 मार्च रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार यांच्या वेतनात 75 टक्के कपात केली होती. तर आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या वेतनात साठ टक्के कपातीची घोषणा केली होती.