गावात सर्व्हे पूर्ण : ढगाळ वातावरणामुळे शुक्रवारी उड्डाण झाले नाही
नायगाव – पुरंदर तालुक्यातील टेकवडी या गावापासून झाली असून या गावचे शुक्रवारी (दि. 12) गावठाणातील मिळकतीचे सिमांकन करण्यात आले; परंतु खराब हवामानामुळे ड्रोन उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे शनिवारी (दि. 13) टेकवडी गावचा सकाळी 9 वाजता “ड्रोन’ आकाश झेपावले अन् यशस्वीरीत्या सर्व्हे करण्यात आला आहे.
भूमी अभिलेख विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील 39865 गावांचे ड्रोन च्या सहाय्याने गावठाण नगर भूमापन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र राज्याचे जमाबंदि आयुक्त एस. चोकलिंगम यांच्या मार्गदर्शन खाली हाती घेतलेला आहे. त्यानुसार मागील वर्षी पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावचा ड्रोनद्वारे प्रायोगिक तत्त्वावर भूमापन यशस्वी रित्या पार पाडण्यात आले होते. त्यानंतर आता त्याच धरर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रातील गावांच्या गावठणाचा सर्व्हे करण्यात येणार आहे.
सर्व्हे ऑफ इंडिया ग्रामविकास विभाग व भूमी अभिलेख विभाग संयुक्त रित्या हा प्रकल्प राबविणार आहेत, त्याची सुरुवात टेकवडी गावापासून झाली आहे. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक तवरेज, हट्टेकर तसेच पुरंदर भूमी अभिलेख कार्यालयाचे रमेश पिसे, नितीन वाडकर, एस. एस. ताथवडकर, एस. पी. भांगरे, एस. व्ही. लवटे, चेतन घोडे. बी. आर. गायकवाड, एस. डी. बाजारी, एस. एच. शेख, एस. एम. चिमटे, टेकवडीचे ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील एकूण 50 गावांचे भूमापन करण्या येणार आहे. या कामी नागरिकांनी सहकार्य करावे.
मिलिंद टोणपे, गटविकास अधिकारी, प. स. पुरंदर