मुंबई – शारदीय नवरात्रोत्सवाच्या काळात आपण सर्वजण शक्तीस्वरूप दुर्गेची उपासना करतो. विविध व्रतवैकल्यांच्या माध्यमातून देवीच्या उपासनेत लीन होतो. आपल्या प्रत्येकाच्या आत एक आत्मशक्ती असून, ती ओळखण्याचा हा कालखंड आहे.
दुर्गामातेला शक्तीचे आद्यपीठ मानले जाते आणि सर्व शक्तींचा स्रोतही. या शक्तीस्रोतामधून ऊर्जा ग्रहण करून स्वतःच्या अंतरंगात देवीचा अंश जागृत करणे हीच देवीची खरी उपासना आहे.
या उपासनेसाठी मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री “रुपाली भोसले’ हिने अनोख्या स्वरूपात देवीची आराधना केली. रुपालीने दुर्गा अवतारातील काही फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.
रुपाली भोसले हिने नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा पहिला लूक शेअर केला होता. या फोटोत ती दुर्गा देवीच्या अवतारात दिसते आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, नवरात्रीच्या शुभेच्छा. देवी दुर्गाची शक्ती प्रत्येक महिलेत असते.
रुपालीच्या या गेटअपसाठी कॉश्च्युम आणि स्टाइल बेन्झ फॅशन (तान्या)ने केली आहे. मेकअप मनिषा कोलगेने केला आहे. तर तिचा हा अवतार राहुल महाडीकने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आणि अमोल जाधव फोटोग्राफरनी पेलली आहे.
रुपाली भोसलेच्या या दुर्गा अवतारातील फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत हिने देखील नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या देवींचे रुप साकारले आहे. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर आकर्षण ठरत आहे.