पाटणा – बिहार विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच विरोधी आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये, आपण जेव्हा वडील माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृतदेहासह पाटणा येथे आलो तेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुर्लक्ष करत अपमानित केलं. असा आरोप लगावला होता.
चिराग पासवान यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना यादव यांनी बिहार मुख्यमंत्र्यांचं हे वर्तन अन्याकारक असल्याचं म्हंटलं.
“नितीश कुमार यांनी चिराग पासवान यांना दिलेली वागणूक योग्य नव्हती. चिराग यांना या वेळी राम विलास पासवान यांची गरज होती, आम्हाला त्यांच्या मृत्यूचं दुःख आहे. मात्र चिराग पासवान यांना नितीश कुमार यांनी दिलेली वागणूक हा अन्याय म्हणावा लागेल.” अशी प्रतिक्रिया यादव यांनी दिली.
चिराग़ पासवान जी के साथ नीतीश कुमार जी ने अच्छा नहीं किया ।चिराग़ के समर्थन में सोमवार को तेजस्वी ने भीबैटिंग कर डाली ।@ndtvindia @Suparna_Singh pic.twitter.com/rPcckqsACL
— manish (@manishndtv) October 19, 2020
यापूर्वी चिराग पासवान यांच्या पक्षातर्फे तेजस्वी यादव यांच्याविरोधात राघोपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यात आल्याने भाजप नेत्यांनी पासवान यांच्यावर टीका केली होती. हा मतदारसंघ भाजपकडे असतानाही चिराग यांनी उमेदवार देणं ते तेजस्वी यादव यांच्यासोबत असल्याचं दर्शवत असं भाजप नेत्यांनी म्हंटल होत.
चिराग पासवान यांच्या या निर्णयामुळे तेजस्वी यादव यांच्यासमोरील आव्हान सोपं झाल्याचं मानलं जातंय. अशातच चिराग पासवान यांनी आज ट्विट करत नितीश कुमार यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. मागील ५ वर्षांच्या कार्यकाळात काय केलं याबाबत अवाक्षरही न काढणं म्हणजे बिहारच्या जनतेशी बेईमानी आहे असं टीकास्त्र डागलंय.
पिछले 5 साल के कार्यकाल पर कुछ नहीं बोलना एक फ़रेब है। बिहार की जनता को जानबुझ के पिछले 5 साल के कार्यों को नहीं बताया जा रहा है।सिर्फ़ कुर्सी के खेल में पिछले 5 साल साहब ने बिहारीयों के बर्बाद किए।#असम्भवनीतीश
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 19, 2020