Tejaswini Pandit | अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मराठीसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘आदिपुरुष’ या हिंदी सिनेमात ती पाहायला मिळाली. यानंतर आता तेजस्विनी दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री करण्यास सज्ज होणार आहे. ‘अहो विक्रमार्का’ असं तेजस्विनीच्या या साऊथ सिनेमाचं नाव आहे.
या सिनेमात ती भवानी शंकर ही भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील तिचा पहिला लुक शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये तेजस्वीनीचे केस विस्कटलेले, चेहऱ्यावर जखम आणि ब्लँकेट घेतलेले पाहायला मिळत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. Tejaswini Pandit |
View this post on Instagram
“जेव्हा विश्वासाला तडा जातो, तेव्हा त्याची जागा धैर्य भरून काढते… तेलगू चित्रपटातील माझं पदार्पण. शुभेच्छा आणि आशिर्वाद असु द्या”, अस कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तेजस्विनीला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा साऊथ सिनेमा पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. Tejaswini Pandit |
देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त तेलुगु, हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली अशा भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ३० ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे ‘अहो विक्रमार्का’ या सिनेमात अभिनेता प्रविण तरडे देखील मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
हेही वाचा:
राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…”मी त्या रस्त्याने कधीच जात नाही”