तेजस्विनीने मिळवला भारतासाठी बारावा कोटा

दोहा : कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सावंत हिने १४ व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत २०२० टोकियो आॅलिंपिकमधील भारताचा बारावा कोटा निश्चित केला. तिने शनिवारी महिलांच्या ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात कोटा मिळवला.

तेजस्विने पात्रता फेरीत ११७१ गुणांची कमाई करत अतिंम फेरीत आपले स्थान निश्चित केले तसेच तिने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवित आॅलिंपिकचे तिकिट मिळवले. या कामगिरीसह टोकियो२०२० मध्ये पात्र ठरणारी भारताची ती १२ वी नेमबाज ठरली आहे.

तत्पूर्वी शुक्रवारी चिंकी यादव हिने नेमबाजीत भारताचा ११ वा कोटा निश्चित केला होता, मात्र तिला महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात पदक मिळवण्यात यश आले नाही. तिने पात्रता फेरीत ५८८ गुणांची कमाई केली.

पात्रता फेरीत दुस-या स्थानावर राहून तिने अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत तिला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. तिला केवळ ११६ गुणांणाच वेध घेता आला. ती सहाव्या स्थानावर राहिली. महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारातील पहिला कोटा राही सरनोबतने मिळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.