वाघोली- करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरांची उपासमार होऊ नये म्हणून वाघोली येथील तेजस्विनी सामाजिक संस्थेच्या वतीने 300 नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दत्तात्रय दाभाडे, वाघोली ग्रामसेवक चव्हाण भाउसाहेब, पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे, माजी सरपंच संजीवनी वाघमारे, माजी सरपंच शिवदास उबाळे, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे तसेच संस्थेच्या अध्यक्षा सारिका किरण पवार, सुनंदा रामदास दाभाडे उपस्थित होत्या.