तेजस्वी यादव बिहारचे नेतृत्व करू शकतात, परंतु…. – उमा भारती

नवी दिल्ली – बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू यांचे एनडीए सरकारची सत्ता स्थापन होणार आहे. या निवडणुकीत एनडीए आणि महाआघाडीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, महाआघाडी बहुमत मिळवू शकले नाही. यावर माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी भाष्य केले आहे.

उमा भारती म्हणाल्या कि, तेजस्वी यादव हे चांगले व्यक्ती आहेत. परंतु, ते सध्या राज्य चालवण्यास सक्षम नाही. राजदचे लालू प्रसाद यांनी पुन्हा एकदा बिहारला जंगलराजमध्ये ढकलले असते. तेजस्वी यादव थोडे मोठ्या झाल्यानंतर नेतृत्व करू शकतात, असेही त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, बिहारची सत्ता मिळवण्यासाठी एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत अतिशय अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये काठावरचे बहुमत मिळवणाऱ्या एनडीएची सरशी झाली. त्या राज्यातील 243 पैकी 125 जागा एनडीएने जिंकल्या. तर विरोधकांच्या महाआघाडीला 110 जागा मिळाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.