राहुल गांधीमध्ये पंतप्रधान होण्याची योग्यता – तेजस्वी यादव

पटना – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यामध्ये पंतप्रधान बनण्याची सर्व योग्यता आहे. तसेच जनतेने भाजप सरकारच्या जुमलेबाजीला बळी पडून नये, असे वक्तव्य राजद पक्षाचे वरिष्ठ नेते तेजस्वी यादव यांनी केले आहे. पटना येथील गांधी मैदानात आयोजित काँग्रेसच्या जनआकांक्षा रॅलीत संबोधित करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, आम्हा लोकांना जेव्हा प्रश्न विचारला जातो की, राहुल गांधी हे पंतप्रधान होण्याचे योग्यतचे आहेत का? तर आम्ही सांगतो हो, ते पंतप्रधान होण्याच्या योग्यतेचे आहेत, त्यांच्यात काहीच कमी नाही. मात्र माझे म्हणणे आहे की, ‘काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आपल्या आणि काँग्रेस पक्षावर लोकांना जोडण्याची सर्वात मोठी जबाबदारी आहे’.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, ‘राहुलजी तुम्ही पंतप्रधान झालात तर बिहारकडे विशेष लक्ष द्या कारण बिहार एक गरीब राज्य आहे’. यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात मोठे खोटारडे सांगत त्यांनी बिहारच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपा केला आहे.

तेजस्वी यांनी आपले वडील लालू यादव यांना शेर म्हणत भाजप त्याच्यां विरोधात सीबीआय लावू शकते मात्र त्यांना लोकांच्या मनातून काढू शकत नाही. लालू यादव यांनी गरीबांसाठी नेहमी काम केले. तेजस्वी यादव यांनी नरेंद्र मोदीं यांना खोट बोलण्याची कंपनी आणि आरएसएसला त्या कंपनीचा रिटेलर असल्याचा आरोप केला.

काॅग्रेसतर्फे जवळ जवळ तीन दशकानंतर पटना येथील गांधी मैदानात पहिली सार्वजनिक सभा आयोजित केली होती. यावेळी रॅलीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्यप्रदेशचे सीएम कमलनाथ, छत्तीसगडचे सीएम भुपेश बघेल, काँग्रेसचे वरिष्ठ नेता अहमद पटेल, जीतन राम मांझी आणि महागठबंधनमधील वरिष्ठ नेते सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)