मुंबई – ‘अग्गबाई सासूबाई’ या झी मराठीवरील मालिकेतील शुभ्रा म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधाननं एका चांगल्या मराठमोळ्या सुनेची भूमिका साकारल्यामुळे सध्या ती बरीच चर्चेत आहे.
View this post on Instagram
Take it day by day, don’t stress too much about tomorrow. #HappyLife 📸@prathamesh_ps_photography
मालिकांमधून घराघरात पोहचलेली, मालिकेप्रमाणे प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्री प्रधानने छाप पाडली आहे.
हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. सध्या इंस्टाग्रामवर तिचे साडीतले फोटो चांगले वायरल होत आहे. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच तेजश्रीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.