तेजश्री प्रधानने केली आगामी चित्रपटाची घोषणा

“होणार सून मी या घरची” या मालिकेतून घराघरात पोहोचलेली जान्हवी अर्थात अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. “झेंडा” या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. 

त्यानंतरचा तिचा मालिका आणि चित्रपट असा करिअरचा ग्राफ नक्कीच कौतुकास्पद आहे. लग्न पहावे करून, ओली की सुकी, ती सध्या काय करते, असेही एकदा व्हावे, जजमेंट, हाजीरी, अन्य-द अदर अशा बऱ्याच चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 

तेजश्रीने नुकताच आपल्या स्वतःच्या प्रोडक्‍शन हाऊसची घोषणा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून केली होती. “टेक प्रॉडक्‍शन्स” असे तिच्या प्रॉडक्‍शन हाऊसचे नाव आहे. या प्रॉडक्‍शन हाऊसअंतर्गत त्यांनी नव्या चित्रपटाची घोषणादेखील केली आहे.

“लव रश” असे या चित्रपटाचे नाव असणार आह. विशेष म्हणजे, तेजश्री प्रधान आणि गौरव घाटणेकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची स्क्रिप्ट खुद्द तेजश्री प्रधानने लिहिली असून ती स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील करणार आहे. तेजश्री यात “रेवा”ची भूमिका साकारणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.