तेजप्रताप यादव यांचा राजद विद्यार्थी संघटनेचा राजीनामा 

पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे थोरले चिरंजीव तेजप्रताप यादव यांनी राजदच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. छात्र राष्ट्रीय जनता दल संरक्षक पदाचा आपण राजीनामा देत असून ज्यांना मी “अज्ञानी’ आहे, असे वाटत असेल, तेच “अज्ञानी’ आहेत. आपल्याविषयी अपसमज कोण पसरवत आहेत, याची आपल्याला पुरेशी कल्पना आहे, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्‍त केला आहे.

लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप आणि धाकटे पुत्र तेजस्वी यादव यांच्यामधील रस्सीखेच अधिक तीव्र व्हायला लागली आहे. त्याच गटबाजीमुळे तेजप्रताप यांनी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेच्या महत्वाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तेजस्वी यादव यांना लालू प्रसाद यादव यांचे राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राजदकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी पुढील आठवड्यात जाहीर होणार आहे. त्या यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी तेजप्रताप यांच्याकडून दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचे आता बोलले जाऊ लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.