तमालपत्राचे ‘हे’ फायदे तु्म्हाला माहित आहे का ?

मसाल्याचे पदार्थ जेवणात स्वाद निर्माण करण्यासाठी उपयोगी असतातच, मात्र आपल्या आरोग्यासाठीही ते तितकेच महत्वाचे असतात. या मसाल्याच्या पदार्थांमधीलच एक नाव म्हणजे तमालपत्र. तमालपत्राचा वापर आपल्या आहारामध्ये केल्याने अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. तमालपत्रामध्ये पोषकत्तवे आणि खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. औषध गुणांनी ही तमालपत्र परिपू्र्ण आहेत. चला तर मग जाणून घेऊयात तमालपत्राचे हे आरोग्यादायी फायदे…

तमालपत्राचे फायदे खालीलप्रमाणे –

  • तमालपत्रामध्ये व्हिटॅमिन अ आणि क यांच प्रमाण अधिक असत. त्यामुळे डायबिटीझच्या रूग्णांसाठी हे फायदेशीर आहे.
  • तमालपत्रामध्ये फॉलिक आम्लाच प्रमाणही अधिक आहे, त्यामुळे पोटाच्या तक्रारींपासून तुम्हाला आराम मिळतो.
  • ज्यांना कफचा त्रास आहे अशा लोकांनी तर तमालपत्राचा आपल्या आहारात जरूर समावेश करावा. त्यामुळे तुमची कफची समस्या दूर होईल.
  • अ्ॅसिडीटी, अपचनची समस्या असल्यास तमालपत्राचे सेवन करावे, लवकर आराम मिळतो.

Leave A Reply

Your email address will not be published.