तेज बहादूर यादव यांच्या उमेदवारीवर संकट! निवडणूक आयोगाने दिली नोटीस

वाराणसी – समाजवादी पक्षाने वाराणसी लोकसभा मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जवान तेज बहादूर यादव यांना मैदानात उतरवले आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना आज निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. यापूर्वी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करताना जवान तेज बहादूर यादव यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात आपल्याला भ्रष्टाचाराच्या कारणामुळे सीमा सुरक्षा दलातून बडतर्फ करण्यात आल्याचे कारण दिले होते. तर दुसऱ्यांदा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज भरताना यासंदर्भात कोणताच उल्लेख प्रतिज्ञा पत्रात न केल्याने निवडूक आयोगाने तेज बहादूर यादव यांना नोटीस बजावली आहे.

सैनिकांना मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर आवाज उठवत सोशल माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या, सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव यांना समाजवादी पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी दिली होती. समाजवादी पक्षाने जवान तेज बहादूर यादव यांना वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित केली होती. त्यानंतर निवडूक आयोगाने जवान तेज बहादूर यादव यांना उमेदवारी अर्जात तफावत आढळल्याने आज नोटीस बजावत १ मे पर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

यापूर्वी वाराणसी लोकसभा मतदार संघातून समाजवादी पक्षाने शालिनी यादव यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर यामध्ये बदल करत समाजवादी पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जवान तेज बहादूर यादव यांना मैदानात उतरवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.