तेज बहादूर यादव यांना झटका; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादुर यादव यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. याविरोधात तेज बहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आज तेज बहादूर यांची याचिका फेटाळण्यात आली. जनहित याचिकेच्या आधाराने यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

यादव हे सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना त्यांनी तेथील जवानांना मिळणाऱ्या निकृष्ठ भोजनाविषयीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकला होता.त्यानंतर त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मोदींच्या विरोधात वाराणसी मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. तेज बहादुर यादव यांना समाजवादी पक्षाने अधिकृत उमेदवारही घोषित केले होते. निवडणूक अर्जासोबत त्यांनी एक अपेक्षित सर्टिफिकेट सादर न केल्याने त्यांचा अर्जच बाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.