विशाखापट्टणम – आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे १६ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. षण्मुख वामसी असे मुलाचे नाव असून तो व्यंकटेश्वरा मेट्टा परिसरात रहावयास होता. घरात आई-वडिलांनी कुत्रा पाळू न दिल्याने षण्मुखने हे टोकाचे पाऊन उचलले आहे.
या आत्महतेप्रकरणी एमआर पेट्टा येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. याप्रकरणाची पोलिस चौकशी करीत आहेत.
एका ऑनलाइन मार्केटिंग वेबसाइटवरील षण्मुख यास एक कुत्रा आवडला. या कुत्राची किंमत ३० हजार रुपये होती. षण्मुखने कुत्रा घेऊन देण्याचा हट्ट आई-वडिलांकडे केला मात्र पालकांनी त्याला कुत्रा घेऊन देण्यास नकार दिला. तसेच सध्या नको आपण नंतर कधीतरी नक्की घेऊन असेही आईने मुलाला सांगितले होेेते. मात्र परवानगी न दिल्याने षण्मुख खूप निराश झाला त्यातून त्याने आत्महत्या केली.