वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातून दु:खद बातमी आली आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज टेड डेक्स्टर यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमई ते ८६ वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसह इंग्लंडच्या खेळाडूंनीही शोक व्यक्त केला जात आहे.
Sad news for the cricketing world.
England legend Ted Dexter, one of the greatest batsmen of his time, has passed away at the age of 86. pic.twitter.com/oXGnUAAJ4a
— ICC (@ICC) August 26, 2021
टेड डेक्स्टर यांनी इंग्लंडसंघासाठी 62 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. ते मधळ्या फळीतील आक्रमक फलंदाज होते. त्यांनी गोलंदाज म्हणून संघासाठी उपयुक्त कामगिरी केली होती.
We are deeply saddened to hear the death of former England Captain Ted Dexter this morning 😢
RIP Ted ❤️ pic.twitter.com/YpLTdghbLL
— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) August 26, 2021
62 आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात टेड डेक्स्टर यांनी 47.89 च्या सरासरीने 4 हजार 502 धावा केल्या. यात त्यांच्या 9 शतकांचा आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजीच्या बळावर त्यांनी 66 बळीही मिळवले होते. त्यांनी पहिला सामना 1958 ला खेळला होता, तर अखेरचा सामना 1968 ला खेळला होता. 1961-20 मध्ये ते इंग्लंड संघाचे कर्णधारही राहिले. 30 कसोटी लढतीत त्यांनी इंग्लंड संघाचे नेतृत्व केले होते.