वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवनवे शोध लागत आहेत. नव्या शोधासह वैद्यकीय उपचारांचे नवे तंत्र विकसित होत आहेत. त्यामुळे मानवाचे आयुष्य हे आता पूर्वीपेक्षा दीर्घायुष्य होत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच गेल्या दशक दोन दशकात वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे मानवाचे आयुष्य सुकर झाले आहे. नव्हे खरे तर बदलत्या तंत्रज्ञानाचे आरोग्यसेवेला वरदान लाभले आहे असे म्हणावे लागेल.
दोन दशकापूर्वी देशात आरोग्य क्षेत्रात फारशी प्रगती झाल्याचे पहायला मिळत नव्हते. किंबहुना वैद्यकीय अभ्यासक्रमात देखील फारसे बदल झाल्याचे दिसून येत नव्हते. गेल्या दोन दशकात नव्हे तर मागील दशकात वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग झाल्याचे पहायला मिळते. तसे पाहिले तर वैद्यकीय क्षेत्रात दररोज नवे शोध लागत आहेत. नव्या गोष्टींवर संशोधन होत आहे. आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये ते संशोधन प्रसिद्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून शोधनिबंध सादर केले जातात. त्यातून शस्त्रक्रियेचे नवे पर्याय देखील पुढे येत आहेत. त्यामुळे आमच्या सारख्या डॉक्टरांना नवे प्रयोग करण्याची संधी मिळत आहे.
गेल्या दशकात देशातील वैद्यकीय क्षेत्रात बदल झाल्याचा उल्लेख आपण करतो. त्यावेळी दवाखान्याची जागा अद्ययावत क्लिनिक, प्रयोगशाळेची जागा अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटरने घेतल्याचे दिसून येते. त्याशिवाय छोट्या तीन ते चार बेड्सच्या दवाखान्याची जागा मोठ्या हॉस्पीटलने घेतली आहे. हॉस्पिटलचा विस्तार पाहता आता वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या उतरत आहेत. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे परदेशातील नवेनवे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. उपचाराची साधने सहज उपलब्ध झाल्याने उपचारही शक्य होत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. हॉस्पिटलच्या इमारती देखील चक्क कॉर्पोरेट कंपन्यांप्रमाणे चकाकू लागल्या आहेत. त्यामुळे हॉस्पिटलच्या सेवा सुविधांमध्ये बदल झाल्याचे दिसून येतो आहे. गेल्या दहा वर्षातील ही प्रगती तशी पाहिली तर लक्षणीय अशीच म्हणावी लागेल.
या प्रगतीमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका ही तंत्रज्ञानाची असून त्याच्या प्रगतीमुळेच आज वैद्यकीय क्षेत्रात डोळ्यांपासून हृदयाचा अथवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर सहजसाध्य उपचार करणे शक्य झाले आहे. नव्हे रुग्णाला जीवदान देणे शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वी आम्ही डोळ्याचे प्रत्यारोपण करायचो. आता डोळ्याच्या प्रत्यारोपणसोबत हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड सारख्या अवयवांचे प्रत्यारोपण होते आहे ही प्रगती नाही तर काय? प्रामुख्याने ही प्रगती झाली ती तंत्रज्ञानाच्या जोरावर. तंत्रज्ञान कसे वापरावे हे आम्हा डॉक्टरांनी तंत्र आत्मसात केले. त्याचा वापर करून आम्ही रुग्णांवर उपचार करतो. त्यातून त्याला दृष्टी किंवा जीवदान प्राप्त होते. त्यामुळे तंत्रज्ञान हे आरोग्य सेवेला मिळालेले वरदान म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. डोळ्याच्या नेत्रपटलांच्या विकारांचे निदान करण्यासाठी विना इंजेक्शन नव्या तंत्रज्ञानाच्या आधारे अँजिओग्राफी करणे शक्य झाले आहे. नव्या तंत्रामुळे सोप्या पद्धतीने आणि सुरक्षितपणे डोळ्यांच्या विकाराचे निदान करणे शक्य होणार आहे. नव्या स्वेप्ट सोर्स तंत्रज्ञानाचा वापर करून अँजिओग्राफी करण्यापूर्वी इंजेक्शन देण्याची आवश्यकता भासत नाही. बहुतांश रुग्णांच्या डोळ्याची अँजिओग्राफी विना इंजेक्शन करता येणे शक्य असते. पूर्वीची इंजेक्शन देण्याची पद्धत
कालबाह्य ठरली नसली तरी त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत नाही. नव्या तंत्रज्ञानामुळे डोळ्याच्या नेत्रपटल आणि नेत्रपटलाच्या खालील पडद्याच्या भागापर्यंत जाता येते. त्यानंतर डोळ्याच्या नेत्रपटल आणि तसेच नेत्रपटलाच्या विकारांचे निदान करणे शक्य आहे.
मोतीबिंदू काचबिंदूमुळे डोळ्या वरील ताण कमी करण्यासाठी हे भिंग काढणे आवश्यक होते. त्याबरोबरच महिलेला दृष्टी देण्यासाठी कृत्रिम भिंगारोपणाची आवश्यकता होती. डोळ्याच्या आतील भागात भिंगाला कोणताही आधार नव्हता. त्यामुळे पारंपरिक पद्धतीच्या शस्त्रक्रियेद्वारे मोतीबिंदू काढणे अशक्य होते. डोळ्याच्या बुबुळाशेजारील पांढरा भाग असतो. त्याला क्लेरा असे म्हटले जाते. त्या भागात खोबणी तयार करण्यात येऊन त्याच्या आधारे कृत्रिम टोरीक भिंगाचा (लेन्स) वापर करून त्याच्या रोपणाचे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे. त्या तंत्राचा वापर करून महिलेला दृष्टी देण्यात यश आले आहे. तिरळेपणाच्या दुर्मिळ प्रकारात रुग्णाचे डोळे वर आणि खाली अशा स्वरुपात असतात. अशा रुग्णाच्या डोळ्यांतील तिरके सकयू कापण्या बरोबरच ते गुंडाळून ठेवण्याच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचे तिरळेपण कायमचेच दूर होतो. मायोएक्टोमी या पूर्वीच्या तंत्रात सुधारणा करून एनआयओ हॉस्पिटलच्या नेत्रतज्ज्ञांनी केलेल्या संशोधनातून नवे तंत्र विकसित झाल्याचे सिद्ध झाले. डोळ्याला इजा होणे, डोळ्याचा पडदा खराब होणे, पडदा सरकणे यासारख्या आजारांवर आता अद्ययावत फेम्टोलेसर, व्हिक्ट्रोटॅमी यासारखे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध झाले आहे. हे झाले डोळ्यांचे उपचारांबाबत.
कॅन्सर, पोटाची अथवा शस्त्रक्रियेच्या पद्धतीत आता बदल झाले आहेत. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याने अवयवाना मोठय् प्रमाणात टाके घालण्याची गरज नाही. अथवा त्यामुळे जास्त दिवस रुग्णालयात थांबण्याची गरज राहत नाहीत. परिणामी रुग्ण लवकर बरा होतो. त्याला लवकर घरी सोडले जाते. त्यामुळे त्याचा उपचाराचा खर्च ही कमी होणे आता शक्य आहे. सध्याचे दिवस हे नोकरदारांसाठी धावपळीचे आहे. त्यामुळे त्यांना उपचाराच्या नावाखाली जास्त दिवस रुग्णालय किंवा घरात बसणे परवडत नाही. रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी आल्यावर आजार बरा कधी होईल आणि आम्ही नोकरीवर कधी जाऊ शकतो हा प्रश्न पहिला करतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचे बदल होत आहे. हे बदल स्वागतार्ह असले तरी ते महागडे आहेत. याची जाणीव आता सामान्यांना झाली पाहिजे. महागडे उपचार हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावे ही आमची सुद्धा इच्छा आहे. परंतु, त्याकरिता त्या सुविधा सर्वच ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजेत. अन्यथा उपचार उपलब्ध असले तरी ते उच्चभ्रू वर्गांसाठी उपलब्ध होता कामा नये. तर सर्वसामान्य मध्यमवर्गियांना देखील त्याचा लाभ घेता आला पाहिजे. त्यांच्यासाठी तंत्रज्ञान वरदान ठरले पाहिजे, हीच अपेक्षा.
एनआयओ हे पुण्यातील पहिले एनबीएच मान्यतप्राप्त नेत्र रूग्णालय आहे. रूग्णालयाची स्थापना 1993 मध्ये झाली. 20 हून अधिक नेत्रतज्ज्ञ आणि 70 नर्सिंग, पॅरामेडिकल आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली टीम रूग्णांसाठी सक्षमपणे कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, एनआयओने सबस्पेशऍलिटी क्लिनिक, सुसंघटित डायग्नोस्टिक, इमेजिंग आणि लेझर सिस्टीम, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, डे केअर रिकव्हरी सूट, अत्याधुनिक प्रशिक्षण आणि शिक्षण सुविधा येथे उपलब्ध आहेत.
एनआयओमध्ये कॉर्निया, रेटिना, पेडियाट्रिक नेत्ररोग, न्युरो नेत्ररोगशास्त्र आणि ऑक्युलोप्लास्टी संबधित नेत्रविकारांवर उपचार केले जातात. नेत्रविकारांशी संबधित लेझर ट्रीटमेंट, रेटिनल शस्त्रक्रिया येथे उपलब्ध आहेत. रूग्णालयात दर वर्षी सुमारे 75 हजार रूग्णांची तपासणी केली जाते आणि जवळजवळ सहा हजार शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाजीनगर येथील शाखेप्रमाणेच आता एनआयओची औंध येतील ब्रेमेन चौकाजवळही शाखा सुरू करण्यात आली आहे.
एनआयओची खासियत आणि खरी ओळख…
डॉ. श्रीकांत केळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून अथक परिश्रमांच्या जोरावर उभ्या केलेल्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ऑप्थॅल्मॉजीचा (एनआयओ) आज झालेला विस्तार अभिमानास्पद असून, रूग्णांसाठी दृष्टी देणारे रूग्णालय अशी ओळख निर्माण झाली आहे. डॉ. केळकर आणि त्यांच्या कुटुंबियांनी समाजसेवेचे घेतलेले हे व्रत अभिमानास्पद आहे. डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर ही डॉक्टरांची पुढची पिढी त्याच समाजभावनेने वारसा पुढे नेत आहे. नॅशनल इन्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉजीचा (एनआयओ) अर्थात राष्ट्रीय नेत्रचिकित्सा संस्था हे पुण्यातील नामांकित सुपर स्पेशालिटी नेत्र रूग्णालय आहे. रूग्णांना उच्च गुणवत्तेची आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी संस्था काय प्रयतक्शील आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नेत्रचिकित्सा करण्यावर येथे भर दिला जातो. अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित अनुभवी कर्मचारी हीच एनआयओची खासियत आणि खरी ओळख.
शिवाजी नगर सेंटर :
1187/30 घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयाजवळ, शिवाजीनगर,
पुणे-411 005. फोन : 020-41460100औंध सेंटर :
376, सिंध सोसायटी, ब्रेमेन चौक, गणेशखिंड रस्ता, औंध,
पुणे-411 007. फोन : 020-49014901