आणि थेट मोदीच ‘त्याच्या’ मदतीला सरसावले 

सुरत : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरत दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगलेच कौतुक होत आहे. सुरत विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान जनतेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान अचानक सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या एलईडींचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तंत्रज्ञास भोवळ आली आणि तो खाली पडला. तंत्रज्ञ खाली पडल्याचे लक्षात येताच काही माध्यम प्रतिनिधी मदतीस सरसावले. पंतप्रधान मोदींच्या लक्षामध्ये ही बाब येताच त्यांनी आपले भाषण थांबवत आपल्या सुरक्षा रक्षकांना सदर व्यक्तीला वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.

पंतप्रधानांच्या आदेशानंतर लगेचच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आणि भोवळ येऊन पडलेल्या तंत्रज्ञास शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सद्भावनेमुळे त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)