तंत्रशिक्षणच्या बॅकलॉग परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित आणि तंत्रशिक्षणच्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातील अंतिम वर्ष वगळता उर्वरित बॅकलॉग परीक्षेचे वेळापत्रक राज्य तंत्रशिक्षण मंडळाने प्रसिद्ध केले. त्यानुसार या परीक्षा 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे या परीक्षा संस्थास्तरावर होणार आहे. त्याबाबतची कार्यपद्धती राज्य तंत्रशिक्षण मंडळाने जाहीर केली.

प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने विविध मिटिंग ऍप्लिकेशनचा वापर करून घेण्यात यावी. शक्‍य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने घ्यावी. सर्व प्रयत्नानंतरही ती घेणे शक्‍य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे सत्रकर्म, जर्नल्स, निरंतर मूल्यमापन या आधारावर मूल्यमापन करून गुण देण्यात यावेत, असे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी स्पष्ट केले.

संस्थास्तरावरील लेखी परीक्षा विद्यार्थी प्रवेशित असलेल्या संस्थेमार्फत घेण्यात याव्यात. त्यासाठी सर्व संस्थांना परीक्षा केंद्र म्हणून घोषित केले आहे. लेखी परीक्षा “एमसीक्‍यू’ पद्धतीने ऑनलाइनद्वारे संस्थास्तरावरून घेण्यात येणार आहे. ती मोबाइल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप आदीचा वापर करून देऊ शकतील. प्रत्येक प्रश्‍न 1 गुणाचा असेल. या परीक्षेचा कालावधी 1 तासाचा असेल. 

ज्या विषयाच्या अभ्यासक्रमात ड्राईंगचा समावेश असल्याने त्या विषयाची परीक्षा एमसीक्‍यू पद्धतीने घेता येणे शक्‍य नाही. अशा विषयाची परीक्षा सादरीकरणाद्वारे तसेच तोंडी प्रश्‍नोत्तरांच्या आधारे घेतले जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा अधिकचा वेळ देण्यात यावे, असेही डॉ. चितलांगे यांनी सांगितले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.